Privacy Policy In Marathi

गोपनीयता धोरण

ही गोपनीयता सूचना अखेरीस 9 एप्रिल 2024 रोजी अद्यतनित करण्यात आली. आम्ही, 1Lotus Marketing Research Services (“आम्ही”, “आम्हास”, “1Lotus Research”, “आमचे”, “कंपनी”), हे 1Lotus Research (https://1lotusresearch.com/) (“संकेतस्थळ”) या संकेतस्थळाचे मालक आहोत. ही वेबसाइट आरोग्यसेवा आणि तंत्रज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये; ज्यात पुढील क्षेत्रांचा समावेश आहे परंतु ते तेवढ्यापुरतेच मर्यादित नाही, प्रत्यक्ष व ऑनलाइन सर्वेक्षणे, मुलाखती, फोकस ग्रुप्स आणि इतर पद्धतींद्वारे माहिती संकलित करण्याच्या सेवा पुरवते. तसेच, ही वेबसाइट क्षेत्रीय कामाची प्रक्रिया सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हाताळते, ज्यामुळे उच्च दर्जाच्या माहितीचे संकलन सुनिश्चित होते, ज्यामुळे त्यांच्या ग्राहकांसाठी व्यवसायासंबंधी अधिक उत्तम निर्णय घेणे शक्य होते (“सेवा”). आम्ही डेटा गोपनीयतेच्या अधिकारांचा आदर करतो आणि गोपनीयतेप्रती असलेल्या त्याच्या वचनबद्धतेशी सुसंगत अशी ही गोपनीयता सूचना तयार केली आहे. ही गोपनीयता सूचना (“गोपनीयता सूचना”) आम्ही संकेतस्थळावर संकलित केलेला वैयक्तिक डेटा कसा संकलित करतो, वापरतो आणि संरक्षित करतो, हे स्पष्ट करते.

कृपया ही गोपनीयता सूचना काळजीपूर्वक वाचा. संमतीच्या चेक बॉक्सवर क्लिक करून, तसेच 1LOTUS MARKETING RESEARCH SERVICES च्या संकेतस्थळाला भेट देऊन आणि त्याचा वापर करून, तुम्ही खाली नमूद केलेल्या या गोपनीयता सूचनेच्या अटींना सहमती दर्शवता. याद्वारे, तुम्ही 1 Lotus Marketing Research Services ला, येथे नमूद केलेल्या उद्देशांसाठी आणि व्याप्तीमध्ये, तुमच्या वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करण्याची परवानगी देत ​आहात. जर तुम्ही या सूचनेतील अटींशी सहमत नसाल, तर तुम्ही तुमची संमती मागे घेऊ शकता; किंवा पर्यायाने, या संकेतस्थळावर तुमची वैयक्तिक माहिती न देण्याचा निर्णय घेऊ शकता. जर तुम्ही एखाद्या तृतीय पक्षाच्या वतीने संकेतस्थळ वापरत असाल, तर तुम्ही हे मान्य करता की, अशा तृतीय पक्षाला या गोपनीयता सूचनेच्या अटी व शर्तींशी बांधील ठेवण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे आणि अशा स्थितीत, तुमचा प्लॅटफॉर्म किंवा संकेतस्थळाचा वापर त्या तृतीय पक्षाद्वारे केलेल्या वापरासाठी लागू होईल. जर तुमच्याकडे (एखाद्या तृतीय पक्षाचा कोणताही वैयक्तिक डेटा प्रदान करण्याचा) असा अधिकार नसेल किंवा तुम्ही या गोपनीयता सूचनेच्या अटींशी सहमत नसाल, तर तुम्ही प्लॅटफॉर्म किंवा संकेतस्थळाचा वापर करणे टाळावे. हे गोपनीयता धोरण, लागू असलेल्या अधिकारक्षेत्रांच्या डेटा संरक्षण कायद्यांचा पालन करणारा आणि त्यानुसार अर्थ लावला जाणारा, एका इलेक्ट्रॉनिक कराराच्या स्वरूपातील एक इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज आहे.

1.व्याख्या

2.1Lotus Research द्वारे संकलित केलेली वैयक्तिक डेटा

आम्हाला तुमचा वैयक्तिक डेटा खालील बाबतीत प्राप्त होऊ शकतो:

3.कुकीज

आम्ही वापरकर्त्याच्या ट्रॅफिक आकृतिबंधाचा मागोवा घेण्यासाठी कुकीज आणि/किंवा तत्सम अंतर्गत आणि तृतीय-पक्ष ट्रॅकिंग साधनांचा वापर करतो. माहिती संकलित करण्यासाठी आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी, तसेच आमच्या संकेतस्थळामध्ये सुधारणा व त्याचे विश्लेषण करण्यासाठी बीकन्स, टॅग्ज आणि स्क्रिप्ट्स अशा ट्रॅकिंग साधनांचाही वापर केला जातो. तुम्ही तुमच्या ब्राउझर सेटिंग्जद्वारे कुकीज अक्षम करणे निवडू शकता. अधिक माहितीसाठी, कृपया आमचे कुकी धोरण येथे गोपनीयता धोरणामध्ये पहा.

4.माहितीची अचूकता

भेट देणारे/सहभागी हे मान्य करतात की, आमच्यासोबत सामायिक केलेल्या वैयक्तिक डेटाच्या (मग ती त्यांची स्वतःची असो किंवा कोणत्याही तृतीय पक्षाची) अचूकतेसाठी, योग्यतेसाठी किंवा सत्यतेसाठी ते पूर्णपणे जबाबदार असतील. जर भेट देणारे/सहभागी एखाद्या तृतीय व्यक्तीच्या वतीने कोणतीही वैयक्तिक माहिती सामायिक करत असतील, तर ते याचे प्रतिनिधित्व करतात आणि हमी देतात की, त्यांच्याकडे कंपनीसोबत अशी वैयक्तिक माहिती सामायिक करण्याचा आवश्यक अधिकार आहे, त्यांनी अशा तृतीय पक्षाकडून लेखी संमती मिळवली आहे आणि त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी कंपनीची राहणार नाही. भेट देणारे/सहभागी हे समजून घेतात आणि मान्य करतात की, अशी वैयक्तिक माहिती या गोपनीयता सूचनेच्या अटी व शर्तींच्या अधीन असेल.

5.अनामिक माहिती

आम्ही संकलित केलेला तुमचा वैयक्तिक डेटा एकत्रित अनामिक डेटा तयार करण्यासाठी देखील वापरू शकतो. कृपया लक्षात घ्या की, व्यक्तींसोबतच्या आमच्या बहुतांश संवादात अनामिक डेटाचा समावेश असेल, कारण आम्ही व्यवस्थापित करत असलेल्या बाजार संशोधन अभ्यास आणि अहवालांमध्ये, आम्ही व्यक्तींच्या प्रतिसादांना शक्य तितक्या लवकर अनामिक करतो. आम्ही हे सुनिश्चित करू की असा अनामिक डेटा कोणत्याही व्यक्तीला किंवा आमच्यासोबत सामायिक केलेल्या वैयक्तिक डेटाला थेट ओळखण्यायोग्य नसेल. आम्ही हा अनामिक डेटा कोणत्याही उद्देशासाठी वापरू शकतो, ज्यामध्ये आमच्याद्वारे किंवा तृतीय पक्षांद्वारे विकसित केलेले संशोधन करणे, विश्लेषणात्मक उद्देश आणि आमचे बाजार संशोधन सुधारणे यांचा समावेश आहे, परंतु ते इतकेच मर्यादित नाही. आमची वेबसाइट वापरून किंवा आमच्या सेवांमध्ये सहभागी होऊन, तुम्ही आम्हाला अनामिक डेटा संच तयार करण्यासाठी आणि आमच्या व्यावसायिक उद्देशांसाठी तुमचा वैयक्तिक डेटा वापरण्याचा अधिकार प्रदान करता.

6.वैयक्तिक डेटा संकलनाचा वापर/उद्देश

आम्ही वैयक्तिक डेटाचा वापर खालील उद्देशांसाठी करतो:

7.खुलासे

तुमच्या पूर्वसंमतीशिवाय, आम्ही तुमचा वैयक्तिक डेटा कोणत्याही त्रयस्थ पक्षांना विकत नाही, भाड्याने देत नाही, सामायिक करत नाही, वितरित करत नाही, लीजवर देत नाही किंवा अन्य कोणत्याही प्रकारे उपलब्ध करून देत नाही. ही बाब लक्षात घेऊन, आम्ही तुमचा वैयक्तिक डेटा खालील प्रसंगी उघड करू शकतो:

8.डेटाचे जतन

लागू असलेल्या डेटा गोपनीयता कायद्यांनुसार, तुम्हाला खालील अधिकार आहेत:

लागू असलेल्या डेटा गोपनीयता कायद्यांनुसार, तुम्हाला खालील अधिकार प्राप्त आहेत: विनंतीच्या स्वरूपानुसार, आम्ही तुम्हाला वैयक्तिक माहिती विनंती फॉर्म भरण्यास सांगू शकतो किंवा तुमची विनंती पडताळून पाहण्यासाठी काही विशिष्ट तपशीलांची मागणी करू शकतो. वैयक्तिक माहितीशी संबंधित सर्व विनंत्यांवर वाजवी कालावधीत कार्यवाही केली जाईल. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही अधिकाराचा वापर करायचा असेल, तर कृपया dpm@1lotusresearch.com या पत्त्यावर संपर्क साधावा.

9.तुमचे अधिकार

लागू असलेल्या डेटा गोपनीयता कायद्यांनुसार, तुम्हाला खालील अधिकार आहेत:

विनंतीच्या स्वरूपानुसार, आम्ही तुम्हाला वैयक्तिक माहिती विनंती फॉर्म भरण्यास सांगू शकतो किंवा विनंतीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी काही विशिष्ट तपशीलांची मागणी करू शकतो. वैयक्तिक माहितीशी संबंधित सर्व विनंत्यांवर वाजवी कालावधीत कार्यवाही केली जाईल. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही अधिकाराचा वापर करायचा असेल, तर कृपया dpm@1lotusresearch.com या पत्त्यावर संपर्क साधावा.

10.सुरक्षा

तुमचा वैयक्तिक डेटा स्थानिक LAN सर्व्हर, Google Workspace आणि Godaddy सर्व्हरवर साठवला जातो. वैयक्तिक डेटाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही उद्योग-प्रमाणित सुरक्षा उपाय अंमलात आणतो. जरी आम्ही योग्य फायरवॉल्स आणि सुरक्षा व्यवस्था पुरवत असलो, तरीही प्रसारित केल्या जाणाऱ्या वैयक्तिक डेटाच्या सुरक्षेची आम्ही हमी देऊ शकत नाही; कारण या प्रणाली हॅकिंगपासून अभेद्य नाहीत. अनधिकृत हॅकिंग, व्हायरसचे हल्ले, तांत्रिक समस्यांमुळे डेटाची चोरी होण्याची शक्यता आहे; अशा घटनांचा प्रभाव कमी करण्यासाठी आम्ही आवश्यक ती पावले उचलू.

11.युरोपियन युनियन आणि युनायटेड किंगडममधील अभ्यागतांसाठी माहिती

युरोपियन युनियन (“EU”) आणि युनायटेड किंगडम (“UK”) येथील रहिवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी की, ही गोपनीयता सूचना युरोपियन युनियनच्या सामान्य डेटा संरक्षण नियमावली (“GDPR”) आणि युके GDPR, युनायटेड किंगडम डेटा संरक्षण कायदा 2018, गोपनीयता आणि इलेक्ट्रॉनिक संप्रेषण नियमावली आणि वरीलपैकी कोणत्याही नियमावलीची जागा घेणाऱ्या इतर कोणत्याही नियमावलीच्या (“UK गोपनीयता कायदे”) आवश्यकतांनुसार अद्यतनित करण्यात आली आहे. GDPR आणि UK गोपनीयता कायद्यांच्या तरतुदींनुसार, आम्ही तुमचा या संकेतस्थळाचा वापर / त्यात प्रवेश केल्यामुळे संकलित झालेल्या वैयक्तिक डेटाचे नियंत्रक आणि तुम्ही या सेवांचा वापर / त्यात प्रवेश केल्यामुळे संकलित झालेल्या वैयक्तिक डेटाचे प्रक्रियक म्हणून मानले जाऊ.
कायदेशीर आधार (EU आणि UK रहिवाशांसाठी):
कायदेशीर आधार असल्याशिवाय आम्ही तुमच्या वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करणार नाही. आम्ही तुमच्या वैयक्तिक माहितीवर केवळ संमती, करार किंवा आमच्या कायदेशीर हितसंबंधांच्या आधारावरच प्रक्रिया करू; मात्र असे हितसंबंध तुमच्या गोपनीयतेच्या अधिकारांवर आणि हितसंबंधांवर वरचढ ठरणार नाहीत.
तुमच्या वैयक्तिक माहितीचे सीमापार हस्तांतरण (EU रहिवाशांसाठी):
आम्ही संकलित करत असलेली (EU आणि UK मधील रहिवाशांची) वैयक्तिक माहिती EU प्रदेशात किंवा भारतात स्थित सर्व्हर्सवर साठवली जाते. या वैयक्तिक माहितीवर EU आणि UK च्या बाहेर प्रक्रिया केली जाऊ शकते. आम्ही GDPR आणि UK च्या गोपनीयता कायद्यांमधील तरतुदींनुसार, वैयक्तिक माहिती संकलित करतो आणि EU व UK च्या बाहेर हस्तांतरित करतो. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, कृपया dpm@1lotusresearch.com या पत्त्यावर संपर्क साधा.
तुमचे अधिकार (EU आणि UK मधील रहिवाशांसाठी): तुम्हाला आमच्याकडे खालील विनंती करण्याचा अधिकार आहे:

युनायटेड किंगडममधील रहिवाशांना डेटा संरक्षणाशी संबंधित समस्यांसाठी UK ची देखरेख संस्था असलेल्या माहिती आयुक्तांच्या कार्यालयात (“ICO”) (www.ico.org.uk) कोणत्याही वेळी तक्रार करण्याचा अधिकार आहे. तथापि, तुम्ही ICO कडे जाण्यापूर्वीच तुमच्या समस्यांचे निवारण करण्याची संधी आम्हाला मिळाल्यास आम्हाला आनंद होईल; त्यामुळे कृपया सर्वप्रथम आमच्याशी संपर्क साधावा. तुमची ओळख पटवण्यासाठी, किंवा तुमच्या विनंतीच्या संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी, आम्हाला आपल्याकडून काही विशिष्ट माहितीची विनंती करावी लागू शकते. जर आपल्याला यापैकी कोणत्याही अधिकाराचा वापर करायचा असेल, तर कृपया dpm@1lotusresearch.com या पत्त्यावर संपर्क साधावा. नियंत्रक कायदे: EU आणि UK मधील कोणत्याही रहिवाशांच्या बाबतीत, ही गोपनीयता सूचना अनुक्रमे GDPR आणि UK च्या गोपनीयता कायद्यांमधील तरतुदींच्या अधीन असेल.

12.इतर संकेतस्थळांच्या दुवे

आमच्या वेबसाइटवर तुमच्या आवडीच्या इतर विविध तृतीय-पक्ष वेबसाइट्स/प्लॅटफॉर्म्स/ॲप्लिकेशन्सच्या चे दुवे असू शकतात. कृपया लक्षात घ्या की, अशा तृतीय-पक्ष वेबसाइट्स/प्लॅटफॉर्म्स/ॲप्लिकेशन्सवर कंपनीचे कोणतेही नियंत्रण नाही आणि तुम्ही या वेबसाइट्स/प्लॅटफॉर्म्स/ॲप्लिकेशन्सना तुमच्या स्वतःच्या जोखमीवर ॲक्सेस कराल. त्यामुळे, अशा वेबसाइट्स/प्लॅटफॉर्म्स/ॲप्लिकेशन्सना भेट देताना तुम्ही प्रदान केलेल्या कोणत्याही माहितीच्या संरक्षण आणि गोपनीयतेसाठी आम्ही जबाबदार असू शकत नाही, आणि त्या या गोपनीयता सूचनेच्या अंतर्गत येत नाहीत. तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे आणि अशा वेबसाइट्स/प्लॅटफॉर्म्स/ॲप्लिकेशन्सना लागू असलेले गोपनीयता धोरण पाहावे.

13.नियंत्रक कायदे

हे गोपनीयता धोरण सर्व बाबींमध्ये मुंबई, भारत येथील न्यायालयांच्या अधीन असेल आणि त्याचा अर्थ लावणे आणि त्याची अंमलबजावणी करणे हे मुंबई, भारतातील न्यायालयांच्या तरतुदींनुसारच केले जाईल; आणि या गोपनीयता धोरणांतर्गत कोणत्याही विषयावर निर्णय देण्याचा अनन्य अधिकार केवळ मुंबईतील न्यायालयांनाच असेल.

14.मुलांचा/मुलींचा वापर

या संकेतस्थळाचे प्रयोजन 16 वर्षांखालील मुलांसाठी/मुलींसाठी / व्यक्तींसाठी नाही. आम्ही 16 वर्षांखालील मुलांकडून/मुलींकडून जाणीवपूर्वक कोणतीही वैयक्तिक माहिती संकलित करत नाही किंवा तिची मागणी करत नाही. जर एखाद्या मुलाच्या/मुलीच्या कायदेशीर प्रतिनिधीला / पालकांना असे आढळून आले की, त्या मुलाने/मुलीने आम्हाला आपली वैयक्तिक माहिती पुरवली आहे, तर कृपया आमच्याशी dpm@1lotusresearch.com या पत्त्यावर संपर्क साधावा; आम्ही अशी वैयक्तिक माहिती काढून टाकू.

15.सूचनेमध्ये बदल

1 Lotus Research या गोपनीयता सूचनेमध्ये स्वत: च्या स्वेच्छेनुसार बदल किंवा सुधारणा करण्याचा अधिकार राखून ठेवते. या गोपनीयता सूचनेमध्ये होणाऱ्या कोणत्याही बदलांची माहिती मिळवण्यासाठी, कृपया या पृष्ठाला वेळोवेळी भेट देत रहा; आम्ही या सूचनेमध्ये अधूनमधून अद्यतने करू शकतो. जर आम्ही या गोपनीयता सूचनेमध्ये बदल केले, तर आम्ही ती सुधारित सूचना आमच्या प्लॅटफॉर्मद्वारे उपलब्ध करून देऊ आणि त्यातील अद्ययावत सुधारणेची तारीख नमूद करू. जर अशा बदलांमुळे या सूचनेअंतर्गत तुमचे अधिकार किंवा दायित्वे यामध्ये लक्षणीय बदल होत असतील, तर आम्ही तुम्हाला ईमेलद्वारे किंवा आमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्या बदलांविषयी सूचित करण्यासाठी वाजवी प्रयत्न करू.

16.आमच्याशी संपर्क साधा

या गोपनीयता सूचनेबाबत तुमचे प्रश्न, टिप्पण्ण्या, शंका, तक्रारी आणि सूचनांचे आम्ही स्वागत करतो. तसेच, तुमच्या वैयक्तिक माहितीच्या प्रक्रियेसंदर्भात तुम्ही तुमची संमती मागे घेऊ इच्छित असल्यास, तुम्ही आमचे नियुक्त तक्रार निवारण अधिकारी श्री. अरविंद पंडित यांच्याशी Arvind.pandit@1lotusresearch.com या पत्त्यावर संपर्क साधू शकता. कार्यालयाचा पत्ता: 1Lotus Marketing Research Services, 1108, ओपल स्क्वेअर, 11वा मजला, एस.जी. बर्वे मार्ग, वागळे इस्टेट, ठाणे (पश्चिम), महाराष्ट्र – 400604, भारत. ईमेल पत्ता: dpm@1lotusresearch.com

Scroll to Top